*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांजवेळा*
***********
लाघव सांजवेळा स्पर्श आगळा
हातातला हात तुझा तो गं सुंदरा
स्मरतो गे आजही क्षणाक्षणाला
परि विरहही हा छळतो मनांतरा…..
नित्य व्याकुळ होते अधीर निशा
शोधित तुला कवेत घेते चराचरा
स्मृतीगंध सारा जरी गंधाळलेला
सभोवती सारा भावनांचा पसारा…..
सांगना तूच आता कसे सावरावे
क्षितिजावरती गहिवरला किनारा
नकोनां ! आता जीवघेणी प्रतीक्षा
लोचनी दाटल्या निष्पाप अश्रुधारा…..
****************************
*©️वि.ग. सातपुते( भावकवी)*
*📞( 9766544908 )*