You are currently viewing कलम ३५३ निष्प्रभ करण्याच्या एकतर्फी शासन कार्यवाहीचा राज्यभरात निषेध

कलम ३५३ निष्प्रभ करण्याच्या एकतर्फी शासन कार्यवाहीचा राज्यभरात निषेध

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कामे करुन घेण्यासाठी दहशत व दबाव निर्माण करण्याच्या समाजकंटकांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर, वर्ष २०१७ मध्ये भा.दं.वि. कलम ३५३ व ३३२ मध्ये स्वागतार्ह सुधारणा झाली होती व त्यामुळेच लोकसेवकांवरील हल्ले व शासकीय कामकाजात अडथळा आणणाऱ्या दुष्प्रवृत्तींना आळा बसून, अशा घटनांमध्ये कमालीची घट झाली होती. तथापि, सद्यःस्थितीत भा.दं.वि. कलम ३५३ च्या संरक्षणात्मक तरतुदीत तातडीने बदल करण्याची शासनाची कार्यवाही पूर्णतः एकतर्फी आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी अशी आहे. कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या या कलमात दुरुस्ती करण्याच्या घोषणेनंतर समाजकंटकांचे धाडस वाढले असून, केवळ महिन्याभरातच राज्यभरात सहा ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण – दमबाजीच्या घटना घडल्या आहेत. राज्य शासनाची ध्येयधोरणे व विकास कामे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रभावीपणे करण्याची जबाबदारी शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे. तथापि, भा.प्र.से. अधिकाऱ्यांसह, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ व धमकावण्याच्या सातत्याने होत असलेल्या घटना निश्चितच चिंताजनक आणि संतापजनक आहेत, असे महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग. दि. कुलथे यांनी सांगितले.

महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई म्हणाले की, अधिकारी महासंघाने राज्य शासनाला वारंवार विनंती आर्जव करुन देखील कलम ३५३ मधील संरक्षणात्मक तरतुदी निष्प्रभ करण्याची कार्यवाही प्रस्तावित केल्यानेच, संतप्त अधिकाऱ्यांनी महासंघाच्या नेतृत्वामध्ये आज १५ सप्टेंबर रोजी शासनाच्या या एकतर्फी कार्यवाहीचा निषेध करुन शासकीय कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाण – दमबाजीच्या वाढत्या प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, मंत्रालयासह राज्यभरांतील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उग्र निदर्शने केली.

या उपरांत शासनाकडून कलम ३५३ च्या संरक्षणात्मक तरतुदी पूर्ववत न केल्यास, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार राज्यभरातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

सदर आंदोलनात जुन्या पेन्शनविषयक शासननियुक्त समितीच्या अहवाल सादरीकरणास होत असलेल्या विलंबाकडे शासनाचे लक्ष वेधून, राज्य प्रशासनातील रिक्त जागा कंत्राटी पध्दतीने भरण्याच्या शासन धोरणास देखील तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यावेळी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि राजपत्रित अधिकारी तसेच कर्णधार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा