You are currently viewing कारीवडे ग्रामस्थांचा सावंतवाडी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला विरोध…

कारीवडे ग्रामस्थांचा सावंतवाडी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला विरोध…

ग्रामस्थांचा पत्रकार परिषदेत भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा

सावंतवाडी

येथील पालिकेच्यावतीने कारिवडे येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प सुरू करण्यास कारीवडे ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो प्रकल्प गावात होऊ देणार नाही. नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे होते. ते भाजपाचे असल्यामुळे त्यांनी आमच्याशी चर्चा करणे गरजेचे होते, मात्र तसे न करता थेट प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे, अशी खंतआयोजित पत्रकार परिषदेत सरपंच सौ.अपर्णा तळवणेकर, आनंद तळवणेकर यांनी ग्रामस्थांच्यावतीने दिला आहे.
दरम्यान प्रदूषणकारी व लोकांच्या आरोग्याच्या जीवावर उठणार हा प्रकल्प राबविताना त्या ठिकाणी स्थानिक लोकांना विश्वासात घेतले जात नाही, वारंवार पालिकेचे लक्ष वेधून सुध्दा काहीच दखल घेतली जात नाही.अशाच पध्दतीने हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास भाजपाला सोडचिठ्ठी देण्यासह जीव सुध्दा देण्यास आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता भाजप विरूध्द भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत
ग्रामस्थांनी आज याठिकाणी भाजपाच्या कार्यालय पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी येथे होणाऱ्या घनकचरा प्रकल्पाला विरोध केला.त्या ठिकाणी हा प्रकल्प भरवस्तीत केला जात आहे.त्यामुळे परिसरात असलेल्या घरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आहे.तसेच गावातील योजना लघु पाटबंधारे प्रकल्प याला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका सावंतवाडीच्या पालिका प्रशासनाने घ्यावी, व आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारा हा प्रकल्प तात्काळ थांबवा, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळसकर, अशोक माळकर, राजेंद्र पवार, गुरुनाथ आईर, संजय पार्सेकर, अमोल कारीवडेकर, प्रशांत राणे, महेश गावकर, शंभा खडपकर, उमेश गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + twelve =