पुन्हा एकदा कणकवलीत भरणार गावठी बाजार

पुन्हा एकदा कणकवलीत भरणार गावठी बाजार

२६ जानेवारी पासून होणार शुभारंभ

कणकवली

तालुक्यातील गावठी भाजीपाला, फळे आदी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी यासाठी पुन्हा एकदा गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ येत्या २६ जानेवारी रोजी कणकवलीत करण्यात येणार आहे. दर शुक्रवारी जि.प.बांधकाम विभाग कार्यालयाशेजारी गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. कणकवली पं स आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कणकवली तालुक्यातील गावठी भाजी, धान्य, फळ आदींसह कोकणी मेव्याला हक्काची बाजारपेठ मिळावी आणि थेट ग्राहकांपर्यंत आपला शेतमाल शेतकऱ्यांना विकता यावा यासाठी कणकवली पं स च्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून २६ जानेवारी २०१७ रोजी गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ करण्यात आला होता. कोरोना महामारीच्या काळात मार्च २०२० पासून हा गावठी आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. आता कोरोना साथरोगावर लस उपलब्ध झाल्यामुळे गावठी आठवडा बाजार पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व गावठी शेतमाल उत्पादक आणि ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती मनोज रावराणे, उपसभापती दिव्या पेडणेकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा