पाट हायस्कुलचे कलाशिक्षक संदीप साळसकर यांना हिंदी विभागाचा विशेष सन्मान पुरस्कार…
कुडाळ
पाट हायस्कूलचे कलाशिक्षक संदीप मधुसूदन साळसकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ यांच्यातर्फे विशेष सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
चित्रकला आणि संगीत क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवून मुलांना जे मार्गदर्शन केले गेले, त्यामधून कलाविषयक स्पर्धेत मुलांनी यश मिळवले. यामध्ये एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी तसेच पाट हायस्कूलचे सर्व सहकारी आणि कलाशिक्षक यांचे सहकार्य लाभले. यामुळे कलाविषयक विविध उपक्रम घेणे शक्य झाले, असे संदीप साळसकर यांनी नमूद केले. विशेष म्हणजे प्रशस्त कलादालन, कलेमधुन करिअर, कलाविषयक जादा वर्ग हे विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरते. यामुळे पंचक्रोशीतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी करिअरसाठी कला हा विषय निवडला आणि यश संपादन केले. विविध संस्थाच्या माध्यमातून मिळणारे सहकार्य कला विषय वाढीसाठी फायद्याचे ठरले.
या पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे संस्था, विद्यालय, सर्व सहकारी यांच्यातर्फे कौतूक करण्यात आले.