पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात जीवित हानी नाही.;गाडीचे मोठे नुकसान..
मालवण
कोल्हापूर येथून मालवण येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा परतीच्या प्रवासा दरम्यान बागायत येथे भीषण अपघात घडला मात्र ” काळ आला होता पण वेळ आली नव्हती ” म्हणीचा प्रत्यय या अपघातात पहावयास मिळाला.या चारचाकी मध्ये पाच जण प्रवास करत होते,त्यातील एकाही व्यक्तीला कोणतीही इजा झालेली नाही.सर्वजण सुखरूप आहेत.हा अपघात प्रत्यक्ष दर्शी पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एवढा भीषण अपघात झाला की यातील एकही व्यक्ती वाचला नसता मात्र देव तारी त्याला कोण मारी असा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
मालवण येथे फिरण्यासाठी आलेले कोल्हापूर येथील पर्यटक परतीचा प्रवास करण्यासाठी मालवण बेळणे रस्त्याने प्रवास करत असताना बागायत येथील विठ्ठला देवी पूलानजीक चालकाला डुलकी लागली आणि चालकाचा ताबा सुटला आणि गाडी वेगात रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला
धडकून संरक्षक दगडाला आदळून गाडी हवेत फिरली गाडीची चारही चाके पलटी झाली.अपघात एवढा भीषण होता की मालवण कडून कोल्हापूर ला जाणारी गाडी अपघातानंतर ती पूर्णपणे दिशा बदललेली होती म्हणजेच ती कोल्हापूर वरून मालवणला जाण्याच्या दिशेला तोंड करून जागीच पलटी झाली होती.एवढा भीषण अपघात असून कोणालाही इजा झालेली नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात होताच मोठा आवाज झाल्याने तात्काळ बागायत येतील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीत अडकलेल्या पाचही व्यक्तींना. दरवाज्याच्या खिडकीतून बाहेर काढले तसेच आतील सामान काढून दिले. तसेच त्यांची विचारपूस केली असता दुपारच्या उन्हामुळे चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचे सांगितले. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने गाडी स्थानिकांनी रस्त्यावर आणून दिली.गाडीतील व्यक्ती या कोल्हापुर येथील असून ते महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.अपघातग्रस्त व्यक्तींनी बागायत येथील स्थानिक ग्रामस्थांचे तसेच मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानले. कोकणची माणसं खरच खूप वेगळी ते आज आम्ही अनुभवलो असे नकळत बोलून गेले.