You are currently viewing पाणीटंचाई अहवाल सादर करण्यास २९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

पाणीटंचाई अहवाल सादर करण्यास २९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव

सावंतवाडी

पाणीपुरवठा विभागाकडे पाणी टंचाई संदर्भात तालुक्यातील केवळ १२ ग्रामपंचायतींनी आपले अहवाल सादर केले आहेत.यातील ३ ग्रामपंचायतींनी आपल्याकडे पाणीटंचाई नसल्याचे कळविले आहे.अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उर्वरित ग्रामपंचायतींनी आपले अहवाल का सादर केले नाहीत?,असा सवाल पंचायत समितीच्या मासिक सभेत आज उपस्थित करण्यात आला.दरम्यान भविष्यात त्या ठिकाणी पाणी टंचाई उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण?,असा प्रश्न करीत संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरले जाईल,असा ठराव घेण्यात यावा,अशी मागणी उपस्थित सदस्यांनी सभागृहाकडे केली.मात्र उर्वरित ग्रामपंचायतींना अहवाल सादर करण्यासाठी २९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी,असा ठराव अखेर मंजूर करण्यात आला.
येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती शितल राऊळ, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, पंकज पेडणेकर, मेघश्याम काजरेकर, रवींद्र मडगावकर, मनीषा गोवेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 9 =