You are currently viewing जलजीवन मिशनचे काम करताना पडेल येथे देवीची मूर्ती सापडली

जलजीवन मिशनचे काम करताना पडेल येथे देवीची मूर्ती सापडली

जलजीवन मिशनचे काम करताना पडेल येथे देवीची मूर्ती सापडली

देवगड

पडेल येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या पाईपलाईन खोदायचे काम चालू असताना संकेश्वर मंदिराजवळ देवीची मूर्ती सापडली आहे पडेल येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम चालू आहे या नळ पण योजनेचे काम चालू असते वेळी पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्यादरम्याने सापडली आहे

ही देवीची मूर्ती सापडताच गावातील ग्रामस्थ देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मालक बोडस कुटुंबीयांनी दिली आहे शिवाचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा