You are currently viewing एकदम दणकाच…

एकदम दणकाच…

मुंबई :

चौथ्या सामन्यात गाबाच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित गड सर केला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली. शुबमन गिल, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ३२८ धावांचे आव्हान पार केले. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर गेला. मराठमोळ्या अजिंक्यने  त्यानंतर पुढील तीन सामन्यात भारतीय संघाची धुरा वाहिली.

भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियात इतिहास रचला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या अजिंक्यने धूळ चारली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला. त्यानंतर अजिंक्य भारतात परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाचा गजर आणि रेड कार्पेट अशा थाटात त्याचे सर्वांनी स्वागत केले.

अजिंक्य रहाणे मालिका विजयानंतर मुंबईत परतला आणि त्याचे स्वागत दणक्यात झाले. मुंबईच्या रूपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरून ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यने मुलीला कडेवर घेतच जंगी स्वागताचा स्वीकार केला. सोबत अजिंक्यची पत्नीदेखील होती. ढोल ताशांच्या गजरात अजिंक्यचं स्वागत करण्यात आलं. अजिंक्यच्या नेतृत्वाने  विराट नसतानाही भारतीय संघ कमकुवत नाही हे जगाला दाखवून दिलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − eight =