गाळेल येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या…
बांदा
गाळेल येथील एका युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अक्षय महादेव परब ( वय ३०, रा. गाळेल ) असे त्याचे नाव आहे. मात्र आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या पश्चात वडील व भाऊ असा परिवार आहे.