You are currently viewing केर मध्ये हत्ती कडून ‌शेती – बागायातीचे लाखो रुपयांचे नुकसान…

केर मध्ये हत्ती कडून ‌शेती – बागायातीचे लाखो रुपयांचे नुकसान…

केर मध्ये हत्ती कडून ‌शेती – बागायातीचे लाखो रुपयांचे नुकसान…

वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

दोडामार्ग

तालुक्यातील केर गावात आज सकाळी पाच हत्तीच्या कळपाने धुडगूस घातला असून यामध्ये शेतकरी चंद्रकांत देसाई यांचा मालकीची केळी सुपारी आदी सह अन्य झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे केर गावातच हत्तींनी ठाण मांडले असल्याने ऐन हंगामात काजू बाग बहरत असताना शेती बागायती फिरणे मुश्किल झाले आहे तर आजुबाजुला जंगलात जाणेही शक्य होत नाही त्यामुळें जळणासाठी लागणारे सरण (लाकडे) कशी आणायची असा प्रश्न उपस्थित केला जात शेतकरी वर्गातून ना पिक, ना उत्पन्न, अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे तर जीवापाड मेहनत करून वाढविलेली बागायती पिके उध्वस्त करून लाखो रुपयांची नुकसानी केली आहे

तालुक्यातील ग्रामीण भागातील उदरनिर्वाह हा काजू,आंबा, सुपारी नारळ,केळी आदींवर बागायतदार अवलंबून असतो मात्र तेच उत्पन्न हातातोंडाशी आले असताना घास हिरावून घेतला जात आहे यात केळी सुपारी नारळ आदींवर ताव मारायला हत्ती गावात येत आहे त्यातून जिवीत हानी होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे वन विभागाने कर्नाटक राज्याच्या सीमेवरील राबविलेल्या प्रमाणे त्याचं धर्तीवर ग्रामीण भागातील हत्ती मोहीम राबविण्याची मागणी सरपंच संघठणेने केली आहे याकडे प्रशासनाने लक्ष वेधून हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी तिलारी परिसरातील हत्ती बाधीत भागातून होत आहे दिवसा हत्ती पासून बचाव करता येईल रात्री उशिरापर्यंत अंगणात येत असल्याने जिणे मुश्कील बनले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा