You are currently viewing पोस्टल कर्मचाऱ्यांच्या खंबीरपणे कायम पाठीशी राहणार – समीर नलावडे

पोस्टल कर्मचाऱ्यांच्या खंबीरपणे कायम पाठीशी राहणार – समीर नलावडे

पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमेन व एस.टी.एस.युनियनचे द्विवार्षिक अधिवेशन उत्साहात..

कणकवली
पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमेन व एस.टी.एस.ही युनियन पोस्टमनाच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारी आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्तम काम करत आहे. शहरातील प्रथम नागरिक या नात्याने आपल्या सोबत आहे. माध्यमातून आपल्या अडचणी सोडवण्याचे प्रमाणिक काम करणार आहे. तसेच पोस्टल कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या काळात कायम पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
कणकवली येथे ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमेन व एस.टी.एस.सिंधुदुर्ग विभाग या कर्मचारी संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन नुकतेच शिवशक्ती कार्यालय येथे शाखाध्यक्ष कॉ.शाम निवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय व माहराष्ट्र सर्कल अध्यक्ष बाळासाहेब चाळके,सर्कल सचिव कॉ.राजेश सारंग, कॉ.सुयोग हुले,कॉ. राजू आव्हाड, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेटये आदी मान्यवर उपस्थित होते.
सन २०२० ते २०२२ या दोन वर्षाकरिता शाखाध्यक्ष म्हणून कॉ.शाम निवेलकर, शाखा सचिव पदी कॉ.निलेश ठाकूर, कार्याध्यक्ष कॉ.अजय लाड,व खजिनदारपदी कॉ.महेश आर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांचे नगराध्यक्ष व मान्यवरांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ.अजय लाड तर प्रस्ताविक कॉ.निलेश ठाकूर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 11 =