You are currently viewing विलवडे गावच्या सुपुत्राचा पूरग्रस्तांना दिलासा

विलवडे गावच्या सुपुत्राचा पूरग्रस्तांना दिलासा

रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी केली अडीच लाखाची आर्थिक मदत

विलवडे 
‌विलवडे गावचे सुपुत्र तथा नवी मुंबई महानगर पालिकेचे परीवहन मंडळाचे सभापती रामचंद्र उर्फ आबा धर्माजी दळवी यांनी विलवडे गावातील पूरग्रस्तांसाठी 2,50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली.त्यामुळे विलवडे गावातील पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

विलवडे सरपंच रावजी (दिनेश ) वसंत दळवी, प्रकाश दळवी, कृष्णा सावंत ,परेश धर्णे,कालीदास दळवी, प्रमोद दळवी आत्‍माराम दळवी, नंद किशोर दळवी,प्रभाकर दळवी , जयप्रकाश दळवी, जितेंद्र दळवी , प्रवीण दळवी, अजित दळवी , प्रसाद दळवी,विश्राम दळवी यांनी गावातील पूरग्रस्तांचे घरी जावून भेटी घेऊन पैशांचे वाटप केले आहे. विलवडे गावातील एकूण 41 पुरग्रस्त कुटुंबानी या मदतीचा लाभ घेतला. लाभ घेताना पूरग्रस्त व त्यांचे कुटुंबीयांचे डोळे भरुन आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 3 =