You are currently viewing २२ जानेवारी ला रेडी येथील श्री देवी माऊली मंदिरात विविध धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन

२२ जानेवारी ला रेडी येथील श्री देवी माऊली मंदिरात विविध धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ला :

 

श्रीराम जन्मभूमी अयोध्या श्री रामलला मूर्ती प्राण – प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री देवी माऊली मंदिर, रेडी येथे पौष शुक्ल द्वादशी, कालियुग वर्ष ५१२५ सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी विविध धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मंदिरात सकाळी ०९.०० ते ११.०० वा. अभिषेक, सकाळी ११.०० ते ११.३० वा.प्रास्ताविक व राममंदिर माहिती, सकाळी ११.३० ते १२.०० वा. रामरक्षा व मारूती स्तोत्र पठण, दुपारी १२.०० ते १२.१५ वा. राम नाम जप, दुपारी १२.१५ ते १२.४५ वा. राममंदिर अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, दुपारी १२.४५ ते ०१.०० वा. महाआरती, दुपारी ०१.०० वा. प्रसाद वाटप, संध्याकाळी ०७.०० वा. दिपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी समस्त रामभक्तांनी या मंगल दिनी मंगल वेशात उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांचा आशिर्वाद प्राप्त करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा