You are currently viewing जिल्हा नियोजन आराखडा सव्वा दोनशे कोटींच्यावर नेण्याची जबाबदारी चव्हाण व केसरकरांची – नारायण राणे

जिल्हा नियोजन आराखडा सव्वा दोनशे कोटींच्यावर नेण्याची जबाबदारी चव्हाण व केसरकरांची – नारायण राणे

शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी अधिकार्‍यांना ताकद देणार, पालकमंत्र्याचे स्पष्टीकरण…

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा नियोजनचा आराखडा सव्वा दोनशे कोटींच्यावर झाला पाहीजे. त्यासाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र म्हणून रविंद्र चव्हाण व दीपक केसरकर यांनी पाठपुरावा करावा. जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, मागच्या सारखा पुन्हा या ठिकाणी अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे जिल्हा नियोजनच्या सभागृहात केली. दरम्यान मागच्या काळात जिल्ह्यावर निधी मिळण्यासाठी अन्याय झाला आहे. परंतु आता शंभर टक्के निधी खर्च केला जाणार आहे. त्यासाठी अधिकार्‍यांना ताकद देण्यात येणार असून निधी खर्च करायचा राहीला तर त्याचे कारण शोधले जाणार आहे, असे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा नियोजनची आजची सभा श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिदीप केसरकर यांनी आपला सिंधुदुर्ग आदर्श जिल्हा म्हणून घोषीत करायचा आहे. त्यासाठी आपले काम सुरू आहे, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळा, काही कंपन्या आणि उद्योजकांच्या मदतीने दुरूस्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव सादर करण्याची प्रशासनाला विनंती केली.

त्यानंतर झालेल्या चर्चेत खासदार विनायक राऊत यांनी मागील बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या कामांना स्थगिती का देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी नारायण राणेंनी त्यांना रोखले. बैठक झाल्यानंतर ही कामे घुसविण्यात आली होती. त्यामुळे तशी कामे घेतली जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर पालकमंत्री चव्हाण यांनी यावर आपण बसून तोडगा काढू, कोणावर अन्याय होणार नाही, राजकारण केले जाणार नाही, विकासाच्या मुद्यावर आम्ही काम करू, असे सांगून या वादावर पडदा टाकला. यावेळी सभेच्या सुरवातीला या विषयावर चर्चा करण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील माडखोल, विलवडे, दाणोली येथील नद्यातील गाळ काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी हा गाळ काढला आहे. आता खारेपाटण आदी देवडग पडेल येथील नद्यातील गाळ काढा, अशी मागणी खासदार राऊत व आमदार राणे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 14 =