You are currently viewing अहिंदी भाषिक प्रदेशामध्ये हिंदीचा प्रसार होणे गरजेचे – मा. सौरभ सान्याल

अहिंदी भाषिक प्रदेशामध्ये हिंदीचा प्रसार होणे गरजेचे – मा. सौरभ सान्याल

वैभववाडी.

हिंदी ही राष्ट्रभाषा असून तिचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करून सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. विशेषतः अहिंदी भाषिक प्रदेशामध्ये हिंदीचा वापर होणे गरजेचे आहे असे बँक ऑफ महाराष्ट्र वैभववाडी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री सौरभ सान्याल यांनी सांगितले.
दिनांक १४ सप्टेंबर,२०२२ रोजी आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये हिंदी विभाग व महाराष्ट्र बैंक वैभववाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर हिंदी दिवस कार्यक्रम प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र बैंक वैभववाडीचे शाखा व्यवस्थापक मा. सौरभ सान्याल हे उपस्थित होते. आपल्या वक्तव्यामध्ये मा. सौरभ सान्याल यानी स्पष्ट केले की, आज हिंदी भाषेचा प्रसार व प्रयोग होणे गरजेचे आहे. खासकरून अहिंदी भाषिक प्रदेशामध्ये हिंदी भाषेचा प्रयोग होणे गरजेचे आहे. तसेच सोशल मीडियामध्ये आज हिंदीचा प्रयोग होत आहे पण भाषेचे स्वरूप बदलत चाललेले आहे, असे होता कामा नये असेही ते म्हणाले.


या कार्यक्रमामध्ये हिंदी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ प्राप्त केलेल्या अनुक्रमे सलोनी पवार,अपर्णा कोलते, प्रेरणा कांबळे, प्रज्ञा कोलते व काव्यवाचन स्पर्धेतील अनुक्रमे अंजली चव्हाण, पूजा साखरपेकर,तुषार पारटे,ओमकार तावडे या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविन्यात आले. याचवेळी डॉ. कुंभार यांचे ‘अकरावी हिशोबशास्त्र अध्ययनामध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजना’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.
उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख सहा. प्रा. ए. एम. कांबळे यांनी हिंदीचा प्रसार व प्रयोग होण्यासाठी हिंदी विभागामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येतील असे प्रास्ताविकामध्ये सांगितले. याप्रसंगी कुमारी अंजली चव्हाण व कुमारी पूजा साखरपेकर यांनी आपले हिंदी विषयी विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषाणामध्ये प्राचार्य डॉ. सी. एस. काकड़े यांनी हिंदीचे महत्व प्रतिपादन करत हिंदी हास्य कवितेचे वाचन विशिष्ट शैलीमध्ये केले.
यावेळी विचारमंचावर IQAC समन्वयक डॉ सिरसट, स्टाफ सेक्रेटरी डॉ इंगवले, मराठी विभाग प्रमुख डॉ.गवळी, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. कुंभार उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालतील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहा. प्रा. एन. ए. कारेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − ten =