जुगाराची बैठक वेंगुर्ले येथील लोखंडेवाडीत…

जुगाराची बैठक वेंगुर्ले येथील लोखंडेवाडीत…

बडे राजकीय नेते होणार सामील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगाराच्या बैठका ह्या अगदी कायदेशीर असल्यासारख्याच होत आहेत. जुगाराची तकशीम असणारे सर्व यंत्रणांची योग्य ती बांधाबांधी करून पैशांच्या जोरावर त्यांचे तोंड गप्प करतात आणि लाखोंचे डाव मांडून रातोरात कित्येकांना लाखोंना लुटतात. घरातल्या महिलांचे दागदागिने गहाण ठेऊन काहीवेळा विकुनही अनेक महाभाग जुगारावर पैसे लावतात आणि होत्याचं नव्हतं करून बसतात.
अशीच एक बडे राजकीय नेते, मटका किंग, आणि अट्टल जुगारी सहभागी असणारी जुगाराची बैठक वेंगुर्ले तालुक्यातील गावात लोखंडेवाडीत बसत आहे. संध्याकाळी उकलीचा डाव आणि रात्री कापीचा पट अशी बैठकीची रचना आहे. वेंगुर्ला येथील आवडे गजाली वाले दशावतारी राजा, वेंगुर्लेकरांचे राजे, आणि मटक्याच्या धंद्यात यशस्वी कारकीर्द करून पैशांच्या राशीवर लोळणारे वेंगुल्यातील प्रसिध्द मटकाकींग यांच्या लाखोंच्या तकशीमेतून ही बैठक सुरू होत आहे.
गोरगरिबांच्या छोट्या मोठ्या धंद्यांवर घाला घालणारी संबंधित यंत्रणा मात्र धनदांडग्या लोकांच्या जुगारावर मात्र काहीच कारवाई करत नाहीत, कारण त्यात संबंधित यंत्रणेचे हितसंबंध जुळलेले असतात. त्यामुळेच जिल्ह्यात गैरधंद्याना जोम चढला आहे. गैरधंदे करणारे आणि त्यांना साथ देणारे संबंधित यंत्रणेचे अधिकारी आणि सेवक मात्र मालामाल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा