You are currently viewing भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन

सिंधुदुर्गनगरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती निमित्त जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कणकवली येथील बुध्दविहार स्मारक व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनीही पुष्हार अर्पण करुन अभिवादन केले.
कणकवली येथील बुध्दविहार ते पटवर्धन चौक पर्यंत शासकीय वसतिगृहातील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी प्रभात फेरी काढली. शाहीर उदय भोसले यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर पोवाडा गायनातून जनजागृती केली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कणकवली तहसिलदार पोलीस निरीक्षक, उपकोषागार अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, समतादूत, शासकीय वसतिगृह, आश्रमशाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा