कुडासे तिठा येथे डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या प्रसादचे उपचारादरम्यान निधन…
दोडामार्ग
डंपरच्या मागच्या चाकाखाली मिळाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मोर्ले ता. दोडामार्ग येथील दुचाकीस्वार प्रसाद तुकाराम कांबळे ( वय २७) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
हा अपघात आज सकाळी साटेली-भेडशी रस्त्यावर कुडासे तिठा परिसरात घडला होता. यात प्रसाद हा गंभीर जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे नेण्यात आले होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. तो चांगला गायक म्हणून दोडामार्ग व गोव्यामध्ये प्रसिद्ध होता. तो गेले काही दिवस गोव्यात वास्तव्यास होता.