You are currently viewing कलंबिस्त इंग्लिश स्कुलचे २ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन  

कलंबिस्त इंग्लिश स्कुलचे २ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन  

कलंबिस्त इंग्लिश स्कुलचे २ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन

सावंतवाडी

कलंबिस्त इंग्लिश स्कुल कलंबिस्त या ज्ञानमंदिराचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारीतोषिक वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
“उधाण” २०२४ या कार्यक्रमात सायं ६ ते ७ उद्घाटन,अहवाल वाचन व पारीतोषीक वितरण सायं ७ ते १० विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीम. संध्या गावडे (पोलीस उपअधिक्षक,सावंतवाडी) व प्रमुख मान्यवर म्हणुन श्री.विशाल परब (उपाध्यक्ष-भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट प्रदेश ) हे उपस्थित राहाणार आहेत. तर
सावंतवाडीचे माजी सभापती रविंद्र मडगावकर,कलंबिस्त सरपंच सपना सावंत,वेर्ले सरपंच रूचिता राऊळ,सावरवाड सरपंच देवयानी पवार आदी उपस्थित राहाणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव व संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केले आहे.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

प्रतिक्रिया व्यक्त करा