You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री मा.सुरेश प्रभू यांची स्व.संदेश कोंडविलकर यांना श्रध्दांजली..

माजी केंद्रीय मंत्री मा.सुरेश प्रभू यांची स्व.संदेश कोंडविलकर यांना श्रध्दांजली..

संदेश कोंडविलकर यांनी अगदी प्रतिकुल परिस्थितीत भाजपाचे काम केले.स्व.वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद होते.
विशेषतः कोकण पट्यात त्या काळात भारतीय जनता पक्षाचे काम उभे राहिले त्यात कोंडविलकर करांचा फार मोठा वाटा होता.सर्वसामान्य कार्यकर्ता ही त्यांची उर्जा होती.माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत ते नेहमी सक्रिय असायचे.
रात्रौ त्यांच्या अकाली दुःखद निधनाची बातमी मला अँड.नकुल पार्सेकर यांच्याकडून समजली आणि मी व्यथीत झालो.
भारतीय जनता पक्षाने एक आक्रमक, धडाडीचा कुशल संघटक गमावला पण व्यक्तीगत रित्या मी माझ्या एका चांगल्या मित्राला मुकलो.अशा शब्दात मा.सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती सहवेदना व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 1 =