You are currently viewing तुळस

तुळस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

*तुळस*
~~~~~~
माझिया अंगणात
तुळशीचे वृंदावन
लाविते निरांजन
तुृळशीपाशी………

आज पुण्या मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घरापुढे,मागे अंगण दिसत नसले तरी गॅलरीत,खिडकीत एखाद्या छोट्या कुंडीत का होईना तुळशीचे रोप बहुतांशी घरोघरी दिसतेच. रोज जशी देवपूजा केली जाते तशीच तुळशीला पाणी घालून तिच्यापुढे दिवा लावावा ही आपली हिंदू संस्कृती आहे.

आज कार्तिक शुद्ध एकादशी जिला भागवत एकादशी म्हणतात. देवउठनी एकादशी अशा नावानेही आजची एकादशी ओळखली जाते. त्यामागची कथा अशी आहे. भगवान विष्णू जे चार महीने झोपले होते ते ह्या एकादशीला उठले आणि त्यांनी त्यांना प्रिय असलेल्या तुळशीशी विवाह केला. तेव्हापासून कार्तिकी एकादशी ते कार्तिक पोर्णिमेपर्यंत विष्णूंचाच अवतार श्रीकृष्णाशी तुळशीचे लग्न लावण्याची प्रथा पडली आहे. याच चार दिवसांना देव दिवाळी असेही मानतात. तुळशीला आपल्याकडे माता लक्ष्मीच मानले जाते.

मला आठवते माझ्या लहानपणी आमच्या घरी कार्तिक द्वादशीला तुळशीचे लग्न असायचे. तुळशीची मोठी कुंडी रंगविली जायची. संध्याकाळी आई छान साडी,दागदागिने घालून अगदी लक्ष्मीच दिसायची. आम्ही बहीणीही छान तयार व्हायचो, आणि मग लग्न लागायचे.देव्हार्‍यातील कृष्णाची(नवरदेवाची)मूर्ती सजविली जायची. तुळशीला पिवळे वस्त्र,हिरव्या बांगड्या,मणी मंगळसूत्र असा सर्व सौभाग्यसाज चढविला जात असे.खारीक, बदाम,अक्रोड वगैरे पाच प्रकारच्या सुक्या मेव्याने तुळशीची ओटी भरायची.आजी खास लग्नासाठी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे अनारसे बनवायची.वडील त्यांच्या सुरेल आवाजात मंगलाष्टका म्हणायचे. अशा रीतीने लग्न समारंभ पार पडायचा.

ठाण्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू श्री खंडेराव रांगणेकर यांच्या घरी तर तुलसीविवाह फार मोठ्या प्रमाणात होत असे. असे म्हटले जायचे की उपवर मुलींनी ह्या लग्नाला उपस्थित राहून नवविवाहित तुळशीचे दर्शन घेतले तर त्यांना योग्य स्थळ मिळून त्याच वर्षात त्यांचा विवाह नक्की संपन्न होतो.अर्थात हा प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे.

आजकाल सवडीनुसार भटजी लग्नाचे मुहूर्त काढून देतात,पण तुलसीविवाहानंतर मुलामुलींच्या लग्नांचे मुहूर्त निघतात आणि लग्न मोसम सुरू होतो हे आपण सगळेच जाणतो.

तुलसीमंत्राच्या सहाय्याने कांचन नगरातील कनक राजाच्या मुलीचे,किशोरीचे येणारे वैधव्य वाचले अशीही एक कथा वाचनात आली. तुलसी विवाह करण्याचे हेही एक कारण असावे असे मला वाटते.

*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा