ग्राहक पंचायत महाराष्ट्रची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

ग्राहक पंचायत महाराष्ट्रची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी प्रा.श्री. एस. एन. पाटील, सचिव श्री. संदेश तुळसणकर, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर, कोषाध्यक्ष प्रा.श्री.वैभव खानोलकर, प्रसिद्धी प्रमुख श्री.निलेश जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेल्या ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ संस्थेची जाहीर झालेली सविस्तर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा प्रा.श्री एस.एन. पाटील वैभववाडी), उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे (सावंतवाडी), सचिव श्री. संदेश तुळसणकर (वैभववाडी), सहसचिव महिला समीया चौगुले (देवगड), संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर (कणकवली), सहसंघटक प्रा.श्री.रुपेश पाटील (सावंतवाडी), सहसंघटक महिला सौ.वैदेही जुवाटकर (मालवण), कोषाध्यक्ष प्रा,श्री.वैभव खानोलकर (वेंगुर्ला), प्रसिद्धी प्रमुख श्री.निलेश जोशी (कुडाळ) सदस्य श्री.साबाजी सावंत (दोडामार्ग) अशी जिल्हा कार्यकारिणी संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड, राज्यसचिव श्री.अरुण वाघमारे, राज्य संघटक श्री.सर्जेराव जाधव व सहसंघटक सौ.मेधा कुलकर्णी यांनी जाहीर केली आहे.
या नवीन कार्यकारिणीमध्ये सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देऊन संतुलित जिल्हा कार्यकारिणी स्थापन झाल्यामुळे जिल्ह्यात ग्राहक चळवळीला बळ मिळून सर्वसामान्यांना न्याय मिळण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या संस्थेचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते अनेक वर्षे ग्राहकांसाठी कार्य करीत आहेत. त्यांची संघटनेवर असलेली निष्ठा व काम विचारात घेऊन जबाबदारी सोपविण्यात येत आहे.आपली निवड निश्चित ग्राहकांसाठी शोषणमुक्त, समाज प्रबोधन व सामाजिक बांधिलकी या कार्यासाठी सार्थ ठरेल असा विश्वास संस्थेचे राज्यअध्यक्ष डॉ.विजय लाड व सचिव अरुण वाघमारे यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा