६९ बनावट नोटांसह आणखी दोघांना अटक

६९ बनावट नोटांसह आणखी दोघांना अटक

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु.येथे एका युवकाला २४ नकली नोटांसह पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांकडून विविध प्रकारच्या ६९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या बनावट नोटांच्या प्रकरणात तीन आरोपी पकडण्यात आले असून या तिघांसोबत आणखी एकाचा समावेश असल्याची माहिती आहे. त्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

हिमायतनगर तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी चालू असून, काल १५ रोजी सर्व ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु झाले असून. सोमवार दि.११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बनावट नोटा चलनात आणताना आरोपी शे.सत्तार शे. बाबू वय ३२ वर्ष यास २०० रुपयांच्या २४ बनावट नोटांसह हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे पोटा बु. बसस्थानकावर पकडण्यात आले होते. त्याने येथील दत्तात्रेय जाधव यांच्या किराणा दुकानात बनावट नोट देऊन किराणा सामान खरेदी केल्यानंतर त्यास येथील युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांनतर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी तपासाची चक्रे फिरवीत पोलिसी खाक्या दाखवून आरोपीकडून माहिती घेतली. पोलीस जमादार सुधाकर कदम यांच्या फिर्यार्दीवरून गुरंन ११/२०२१ कलम ४२०, ४८९, (क) भादंवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन दुस-या दिवशी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले.तेव्हा न्यायालयाने चौकशीसाठी पोलीस कोठडी दिली.त्यांनतर बनावट नोटा प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे.

या दोघांकडून २०० रुपयाच्या १७ नोटा, १०० रुपयाच्या ५ नोटा, आणि ५०० रुपयाच्या ४७ अश्या एकूण ६९ नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील आणखी एका आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. जोपर्यंत त्याला अटक होणारं नाही तोपर्यंत त्याचे नाव जाहीर करता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच बनावट नोटांच्या प्रकरणात तीन आरोपी दि.१६ पर्यंत पोलीस कस्टडीत आहेत.

 

त्यांची कसून चौकशी केली जात असून, या टोळीचा मोरख्या कोण. बनावट नोटा कुठून आल्या व किती प्रकारच्या नोटा बाजारात चलनात आणल्या गेल्या याचा शोध लावण्याचे काम पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन, राजेश घुंनर, जमादार बालाजी लक्षटवार, सहाय्यक फौजदार मामीडवार डी बी, जमादार सुधाकर कदम, पोकॉ. मेंडके एन. एस., पोहेकॉ. कागणे के. बी., चालक ठाकूर आदीं करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा