You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजप दोडामार्गच्या वतीने होणार स्वागत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजप दोडामार्गच्या वतीने होणार स्वागत

दोडामार्ग

नगरसेवक ते केंद्रीय मंत्री अशी मजल मारणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांची केंद्रीय मंत्री मंडळात सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रीपदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच कोकण दौऱ्यावर येत आहेत. या निमित्ताने ” मुंबई ते सिंधुदुर्ग ” अशी जन आशिर्वाद यात्रा काढण्यात येत आहे.

या जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने नारायण राणे मुंबई – वसई – विरार – रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग असा प्रवास करीत जनसामान्यांचे स्वागत व आशिर्वाद स्वीकारणार आहेत. २५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात आगमन होणारी ही यात्रा २६ रोजी सिंधुदुर्गच्या तीनही विधानसभा मतदारसंघात मार्गक्रमण करणार आहे.

दोडामार्ग तालुक्याच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची प्राथमिक नियोजनाची बैठक १५ ऑगस्ट भाजप तालुका कार्यालयात येथे घेण्यात आली. दोडामार्ग तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी मंडळअध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे भव्यदिव्य स्वागत करण्याचे नियोजन केले असून राणेंचे स्वागत पारंपारिक पध्दतीने केले जाणार आहे.

बैठकीस मंडळ अध्यक्ष प्रविण गवस,जिल्हा परीषद आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी, दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, विलास सावंत, महीला तालुकाअध्यक्ष कल्पना बुडकुले, सुनिल गवस, संतोष नाईक, योगेश महाले, युवा मोर्चा अध्यक्ष दिपक गवस,राजेश फुलारी यांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =