You are currently viewing भाजपाचे उद्या होणारे बुथ स्तरीय कार्यकर्ता महासंमेलन पुढे ढकलले 

भाजपाचे उद्या होणारे बुथ स्तरीय कार्यकर्ता महासंमेलन पुढे ढकलले 

भाजपाचे उद्या होणारे बुथ स्तरीय कार्यकर्ता महासंमेलन पुढे ढकलले

सावंतवाडी

भाजपच्या सुमारे ४ हजार बुथ स्तरीय पदाधिकाऱ्यांचा उद्या बुधवार दि.२८ फेब्रुवारी रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थित होणारे बुथ स्तरीय कार्यकर्ता महासंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. मुख्यमंत्री सावंत यांना अचानक दिल्ली येथे जावे लागल्याने हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत नजीकच्या काळात होईल असे सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.

सिंधुदुर्गातील भाजपाच्या सुमारे चार हजार बुथ स्तरीय कार्यकर्त्यांचे महासंमेलन सावंतवाडी आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर उद्या २८ फेब्रुवारी रोजी होणार होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना अचानक दिल्ली येथे जावे लागल्याने त्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार राजन तेली यांना विचारले असता ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याने ते नजीकची तारीख देतील त्यावेळी तो होईल मात्र तो लवकरच होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 9 =