प्रयत्न

प्रयत्न

प्रयत्न

खूप प्रयत्न केला,
बरंच काही लिहायचं.
निसर्गाच्या सानिध्यात,
स्वतःला विसरून जायचं.

दाट पसरलेल्या हिरवळीवर,
आनंदाने लोळायचं.
पांढऱ्या शुभ्र धुक्यात,
स्वतःच हरवून जायचं.

दवबिंदूंचे तुषार,
अंगावर झेलायचे.
सोनेरी किरणांसोबत त्यांना,
हसताना पहायचे.

कोकिळेचे मंजुळ स्वर,
कानात साठवायचे.
पहाटेच्या स्वप्नांना,
सत्यात उतरवायचे…

खूप प्रयत्न केला…
स्वतःच स्वतःला
विसरून जायचे…!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा