You are currently viewing डेगवे -आंबेखणवाडी ग्रामस्थातर्फे श्री उल्हास देसाई, मंगलदास देसाई यांचा सत्कार

डेगवे -आंबेखणवाडी ग्रामस्थातर्फे श्री उल्हास देसाई, मंगलदास देसाई यांचा सत्कार

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबईचे सरचिटणीस तथा सेवा निवृत्त राज्यकर निरीक्षक यांची बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या कार्यकारीणी सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांचा व डेगवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पंतप्रधान जनकल्याणकारी प्रचार व प्रसार सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड झालेले मंगलदास देसाई या दोघाचा सत्कार जन्मभुमी असलेल्या डेगवे आंबेखणवाडी ग्रामस्थांनी मकरसंक्रांतीच्ये औचित्य साधून “ब्राह्मणीस्थळात” शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन श्री मनोहर देसाई यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना उल्हास देसाई म्हणाले मी आज भावनाविवश झालो आहे.माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात माझ्या या जन्मभुमीत ४२ वर्षापूर्वी डेगवे आंबेखणवाडी युवक मंडळाचा एक संस्थापक व सरचिटणीस म्हणून झाली.ज्या ब्राह्मणी स्थळी आपल्या सहकार्याने सुरुवात त्याच ठिकाणी माझ्या ग्रामस्थ बांधवांनी केलेला सत्कार म्हणजे माझ्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.ब्राह्मणीस्थळ ,व माझे पुर्वज माझे प्रेरणास्थान आहे.माझ्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या ब्राह्मणीस्थळात संक्रांतीच्या दिवशी सत्कार होतो हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण कधीच विसरू शकत नाही. या ब्राह्मणीतिर्थ क्षेत्राच्या उत्कर्षासाठी सर्व बांधवांनी सहकार्य करण्याचे आवश्यक आहे. त्याकरीता माझा खारीचा वाटा राहील असे त्यावेळी सांगितले. माझा सार्वजनिक कार्याचा प्रवास येथूनच सुरुवात झाली आहे.


मंगलदास देसाई म्हणाले श्री.उल्हास देसाई यांच्या सामाजिक कार्याचा उरक दांडगा असून
आजच्या युवकांना प्रेरणा देणारा आहे.डेगवे-आंबेखणवाडी युवक मंडळ, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, नंदादीप वाचनालय,व आता बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळ हा त्यांचा सामाजिक कार्याचा चढता प्रवास माझ्यासाठी निश्चित प्रेरणा देणारा आहे.माझी पंतप्रधान जनकल्याणकारी योजनेच्या प्रसार प्रचारपदी सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून निवड होताच माझा ग्रामस्थ बांधवांनी सत्कार केला. त्याबध्दल मी आभारी आहे. मला आपले सहकार्य फार मोलाचे लाभले आहे.असेच दोघांनाही यापुढे सहकार्य लाभेल.असा दृढविश्वास व्यक्त करतो.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शामसुंदर देसाई, वामन देसाई, मोहन देसाई, विठ्ठल देसाई, सदानंद देसाई, मंदार देसाई, सुनील देसाई, योगेश मांजरेकर, लक्ष्मण देसाई, महादेव परब, दीपक देसाई, संजय देसाई, लवू देसाई. मधुकर देसाई व सौ.वैशाली देसाई ग्रामपंचायत सदस्य,वैगरे ग्रामस्थ व श्री ब्राह्मणी इश्वटी प्रासादिक भजन मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − seven =