You are currently viewing शरद पवार साहेबांवर बोलण्याएवढे केसरकर कोणामुळे मोठे झाले आणि नावारूपास आले याचे आत्मपरीक्षण दिपक केसरकर यांनी करावे – अमित सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार साहेबांवर बोलण्याएवढे केसरकर कोणामुळे मोठे झाले आणि नावारूपास आले याचे आत्मपरीक्षण दिपक केसरकर यांनी करावे – अमित सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

 

देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यावर शिंदे गटाचे नवनिर्वाचित प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना फुटी बाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्थ असून ज्या पवार साहेबांनी दिपक केसरकराना राजकीय पटलावर झळकवताना प्रवीण भोसले, संदेश पारकर यांच्या सारखे जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि अगदी निकटवर्तीयाना दूर केले आणि सिंधुदुर्ग जिल्हा दिपक केसरकर यांच्या स्वाधीन केला खरा पण अती महत्त्वाकांक्षेमुळे राजकीय फायद्यासाठी शरद पवारांवरची सुद्धा निष्ठा धुळीस मिळवली.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष आमदारकीसाठी नाम. नारायण राणे यांचे सहकार्य कसे घेतले याचे साक्षीदार अमित सामंत, शिवाजीराव कुबल आहेत आणि या सर्वांच्या उपकारांची परतफेड करत ते सेनेत दाखल झाले. सेनेत गेल्या अडीच वर्षांत बेदखल असलेले दिपक केसरकर सध्याच्या राजकीय घडामोडीत शिंदे गटात सामील झाले आणि शिंदे गटाचे प्रवक्ते झाले,आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर बेछूट आरोप करताना शिवसेना फुटीवर देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांचा संबंध जोडून टिका करताना आपण राजकीय उंची कोणामुळे गाठली. यांचे आत्मपरीक्षण करूनच यापुढे शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस वर दिपक केसरकर यांनी टिका करावी. शरद पवार यांच्या राजकीय उंचीशी स्पर्धा करण्याचे धाडस यापुढे दिपक केसरकर यांनी केल्यास दिपक केसरकर यांच्या स्वार्थी राजकारणाच्या इतिहासाचा पोलखोल जनतेसमोर मांडण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा