You are currently viewing प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 16 जानेवारीपर्यत विशेष मोहिम

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 16 जानेवारीपर्यत विशेष मोहिम

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 16 जानेवारीपर्यत विशेष मोहिम

सिंधुदुर्गनगरी

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी 2 ते 16 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी दिली.

  माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ- वंदना योजना सुरु केली आहे.

मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 पोर्टल सुरु झालेले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांअंतर्गत 02 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागु करण्यात आली असुन या योजनेंतर्गत शासनाने अधिसुचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी रु.5000/- दोन टप्प्यात ऑनलाईन पध्दतीने लाभार्थींच्या बँक खातेवर देण्यात येतो. तसेच 1 एप्रिल 2022 नंतर दुसरे अपत्य मुलगी असल्यास रु.6000/- चा लाभ ऑनलाईन पध्दतीने लाभार्थींच्या बँक खातेवर देण्यात येतो. ही योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळुन इतर सर्व मातांना देय आहे. यात सहभागासाठी काही अटी असुन त्या पुर्ण करणाऱ्या मातांचा सहभाग योजनेत केला जातो.

लाभ टप्पा अट रक्कम
पहिले अपत्य पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासुन 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडुन मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणांची नोंदणी आणि किमान एक प्रसुती पूर्व तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. रु.3000/-
दुसरा हप्ता अ)जन्म नोंदणी प्रमाणपत्र

ब)बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, आयपीव्ही आणि हिपॅटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिक लसीकरण चक्र पुर्ण) करणे आवश्यक आहे.

रु.2000/-
दुसरे अपत्य (मुलगी असल्यास) एक हप्ता बाळाच्या जन्मानंतर (जर एखादया लाभार्थीस तिच्या दुस-या गरोदरपणात एकापेक्षा जास्त (जुळे/तिळे/चार) अपत्य झाली असतील व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर तिला PMMVY 2.0 नियमांनुसार दुस-या मुलीसाठीचा लाभ मिळेल.) रु.6000/-

 योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणेबाबत) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु.8 लाख पेक्षा कमी आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.ज्या महिला अंशत: (40%) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन). बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला.आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी. ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी. मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/ अंगणवाडी मदतनीस (AWHs)/ आशा कार्यकर्ती (ASHAs).

                        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,  जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी यांच्याकडुन करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा