You are currently viewing मोती तलावात अज्ञात व्यक्ती बुडाल्याची भिती ; न.प. प्रशासन व पोलीसांकडून शोध सुरु

मोती तलावात अज्ञात व्यक्ती बुडाल्याची भिती ; न.प. प्रशासन व पोलीसांकडून शोध सुरु

मोती तलावात अज्ञात व्यक्ती बुडाल्याची भिती ; न.प. प्रशासन व पोलीसांकडून शोध सुरु

सावंतवाडी

सावंतवाडीतील मोती तलावात अज्ञात व्यक्ती पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील नगरपालिका कार्यालयासमोर तलावाकाळी असलेल्या एस टी बस स्टॉप समोर पुरुष जातीच्या एका व्यक्तीची बॅग सापडली असून त्यात कपडे व चप्पल आढळून आले आहे. त्यामुळे सदर व्यक्ती तलावात पडल्याची भिती व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस तसेच नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा