शुक्रवारपासून कासार्डे बाजारपेठ ७ तारखेपर्यंत बंदचा निर्णय

शुक्रवारपासून कासार्डे बाजारपेठ ७ तारखेपर्यंत बंदचा निर्णय

कासार्डे ग्रा.प. व कासार्डे व्यापारी संघटनेचा निर्णय.

कासार्डे प्रतिनिधी:

कासार्डे गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढत आहे.सध्या बाजारपेठ परीसरात रूग्ण आढळून आले आहेत.त्याचबरोबर कासार्डे बाजारपेठेत तसेच शेजारील गावातील व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने बॅंक, बाजार व इतर कामानिमित्त येत असतात.

यामुळे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता खबरदारी म्हणून शुक्रवार दि.४ सप्टेंबर ते सोमवार दि.7 सप्टेंबर 2020 पर्यंत सर्व बाजारपेठेसह (मेडिकल व डाॅक्टर वगळता) अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय कासार्डे ग्रामपंचायतीने व कासार्डे व्यापारी संघटने घेतल्याची माहिती व्यापारी संघटनेचे सचिव संजय नकाशे यांनी दिली.या काळात बाजारपेठेत गर्दी, विनामास्क नागरीक, अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने चालु ठेवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सर्व व्यापारी बंधुंनी नियमांचे पालन करून याची माहिती ग्रामस्थ व नागरीकांना द्यावी.कासार्डे गावातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी व वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी ७ तारेखपर्यंत बाजारपेठे बंद ठेवण्यात येईल तरी, व्यापारी वर्गाने तसेच नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कासार्डे गावचे सरपंच बाळाराम तानवडे ,कासार्डे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपत पाताडे व सचिव संजय नकाशे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा