You are currently viewing २३ वा पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव १७ ते १९ नोव्हेबर रोजी

२३ वा पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव १७ ते १९ नोव्हेबर रोजी

पद्मश्री पंडिता शुभा मुदगल यांची उपस्थिती

कणकवली

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात मानदंड ठरलेला भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेची रुची व आकलन वाढविणारा वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान चा २३ वा संगीत महोत्सव येत्या १७, १८ व १९ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होणार आहे.

या महोत्सवात याही वर्षी दिग्गज संगीत साधकांना ऐकण्याची संधी जिल्ह्यातील संगीत रसिकांना लाभणार आहे. यावर्षी पद्मश्री पंडिता शुभा मुदगल यांची उपस्थिती या महोत्सवात राहणार असून त्या गायन कार्यशाळेला मार्गदर्शन करणार असून तसेच त्यांच्या गायनाची मैफलही सादर होणार आहे.
यावर्षी वामन दाजी शास्त्रीय गायन स्पर्धेने या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून गुरूवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्घाटन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्याला कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधुत तावडे व पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राचे गुरु पं.डॉ.समीर दुबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तीन दिवसांच्या या महोत्सवात दिनांक १७ नोव्हेंबर रोजी वामन दाजी शास्त्रीय संगीत स्पर्धा संपन्न होणार आहे.मधल्या काळात ही स्पर्धा अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आली होती. परंतू स्पर्धकांच्या आग्रहास्तव संस्थेने ही स्पर्धा पुन्हा सुरु केली असून स्पर्धेच्या पारीतोषिकात वाढ करुन ती १०,०००/-,७०००/- व ५०००/- अशी करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे

या संगीत महोत्सवात १८ व १९ नोव्हेंबर रोजी शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा संपन्न होणार असून प्रथम सत्रात सकाळी १० ते १ मध्ये गाणाऱ्या आवाजाची तयारी याबाबत पं. डॉ. समीर दुबळे मार्गदर्शन करणार आहेत. तर द्वितीय सत्रात सायंकाळी ४ ते ७ यात पंडिता शुभा मुदगल या पुरव अंग ठुमरी गायकी याबाबत तर दिनांक १९ नोव्हेंबर रोजी ९.३० ते १२. ३० या तृतीय सत्रात ठुमरी मे बोल बनाने के तरीके याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक १९ नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजता पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा शुभारंभ होणार असून यामध्ये शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या चे गायन व पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राची विद्यार्थिनी कु. पल्लवी पिळणकर यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. त्यानंतर डॉक्टर अनिश प्रधान यांचं एकल तबला वादन सादर होणार असून महोत्सवाचा समारोप पद्मश्री पंडिता शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. या शिक्षण महोत्सवात संवादिनी साथ पं.श्री.सुधीर नायक करणार आहेत. तीन दिवस कणकवली नगरीला अनोख्या संगीत आस्वादाचा अनुभव देणाऱ्या या संगीत महोत्सवा मध्येतीन दिवस कणकवली नगरीला अनोख्या संगीत आस्वादाचा अनुभव देणाऱ्या या संगीत महोत्सवामध्ये रसिकांनी आपल्या संगीत प्रेमी परिवारासह सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड. एन.आर देसाई व कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 1 =