२०२१ या वर्षातील आमच्यासाठी हे मुख्य आव्हान आहे

२०२१ या वर्षातील आमच्यासाठी हे मुख्य आव्हान आहे

 

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली प्रतिक्रिया

लसीचे वितरण सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त केला. तसेच तो आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण होता असे म्हणत आता प्रत्येक देशवासीयांपर्यंत ही लस पोहोचवणे हे आपल्यासमोरील मुख्य आव्हान असल्याचेही ते म्हणाले. हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की लसीचं आमच्या कंपनीतून वितरण होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. २०२१ या वर्षातील आमच्यासाठी हे मुख्य आव्हान आहे. पाहूया हे कसे पूर्ण करता येईल, असे पुनावाला म्हणाले
सीरम इन्स्टिटयूटची कोविशिल्ड ही लस देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ३ कंटेनर लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आणि पुण्यासह देशात एकच उत्साह आणि आनंदाचे वातावरण तयार झाले. केंद्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्याच धर्तीवर सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशिल्ड लसीच्या उत्पादन व वितरणाने जोर पकडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा