You are currently viewing सभापती सौ.निकिता सावंत यांचा डेगवे – आंबेखणवाडी ग्रामस्थातर्फे जाहिर सत्कार

सभापती सौ.निकिता सावंत यांचा डेगवे – आंबेखणवाडी ग्रामस्थातर्फे जाहिर सत्कार

बांदा

सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ.निकिता सावंत यांचा डेगवे -आंबेखणवाडीच्या ग्रामस्थातर्फे डेगवे गावचे जेष्ठ ग्रामस्थ, सैनिक व माजी सरपंच श्री.नागबा देसाई यांच्या हस्ते श्री ब्राह्मणीस्थळातील तिर्थक्षेत्रात जाहीर सत्कार गुढीपाडव्याचे औचित्य साधून केला.
सर्व प्रथम डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री उल्हास देसाई यांनी त्यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.त्यानंतर तुळशीवृंदावन येथे हार, नारळ, पेढे ठेवले. व समस्थ ग्रामस्थांनी गाराणे घातले.महिलांनी पंचारती ओवाळून औक्षण केले. त्यांची खणा नारळांनी ओटी भरली.
प्रास्ताविक माजी सरपंच मंगलदास देसाई यांनी केले.तर उल्हास देसाई यांनी गुढीपाडव्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ व सभापती यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून श्री ब्राह्मणी स्थळांच्या जिर्णोद्धाराची माहिती दिली.व मार्गदर्शन केले.
या वेळी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ.वैशाली देसाई,सौ.राजश्री देसाई,सौ.शामल देसाई, सौ. निलीमा परब, श्री वामन देसाई, शामसुंदर देसाई, लक्ष्मण देसाई, विनय देसाई, योगेश मांजरेकर, चंद्रकांत देसाई, मोहन देसाई, डेगवे सोसायटीचे माजी चेअरमन सुर्याजी देसाई, अत्माराम देसाई, महादेव परब. सदानंद देसाई, प्रकाश देसाई,वैगेरे आंबेखण ग्रामस्थ आर्वजून उपस्थित होते.आभार योगेश मांजरेकर यांनी केले.

उल्हास देसाई
सरचिटणीस, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 13 =