रेल्वेच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यु

रेल्वेच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यु

नेमळे येथील घटना; पोलिस घटनास्थळी दाखल

सावंतवाडी

नेमळे येथे रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास पोलिस करत आहेत. या अपघातात त्या व्यक्तीचा मृतदेह छिन्न विछिन्न झाल्याने त्या व्यक्तीची ओळख पटवण्यास पोलिसांना अडचण येत आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा