“निर्भीड पत्रकार शेखर सामंत यांचे अभिनंदन”

“निर्भीड पत्रकार शेखर सामंत यांचे अभिनंदन”

पत्रकार हा समाजाचा आरसा, समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचं फार मोठ योगदान आहे.अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, समाजातील उपद्रवमुल्ये याबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भीडपणे आवाज उठवून काही पत्रकार मा. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या आदर्श पत्रकारितेला न्याय देत असतात. एखादी बातमी प्रसिद्ध करताना त्याची सत्यासत्यता आणि दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक असते.खोट्या माहितीवर प्रसारित केलेल्या बातमीमुळे त्या पत्रकाराबरोबर त्या पेपरच्याही विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत.अनेकदा उथळ पत्रकारितेमुळे सामाजिक प्रश्नही निर्माण होतात… मात्र पत्रकारितेच्या या बदलत्या स्वरूपातही काही पत्रकार हे पत्रकारितेचं आणि लोकशाहीच्या या चौथ्या खांबाचं पावित्र्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.कोरोनाच्या भिषण आपत्तीतही अनेक पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून समाजात या संकटकाळात बाधित लोकामध्ये आणि त्यांच्या नातेवाईकामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण केली आणि प्रशाशनाला पुरक असे काम केले.
उद्या सहा जानेवारी पत्रकारदिन..या दिवसाचे औचित्य साधून या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या आमच्या पत्रकार मित्रांचा विविध स्तरावर गौरव करण्यात येणार आहे..आपल्या सिंधुदुर्गातील एक संवेदनशील आणि समाजाभिमुख काम करणारे निर्भीड पत्रकार व आमचे परममित्र शेखर सामंत याना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.पत्रकारितेतील हा प्रतिष्ठित पुरस्कार राज्याचे मा.राज्यपाल यांच्या शुभहस्ते  शेखर सामंत यानां उद्या पत्रकारदिनी प्रदान करण्यात येणार आहे.आमच्या या निर्भीड पत्रकार मित्राचे मनःपूर्वक अभिनंदन….
तसेच समाजात सकारात्मक विचार घेऊन पत्रकारिता करणाऱ्या आमच्या सर्व पत्रकार मित्राना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

.. शुभेच्छुक..अँड.नकुल पार्सेकर..
संस्थापक अध्यक्ष- अटल प्रतिष्ठान.

प्रतिक्रिया व्यक्त करा