You are currently viewing जनतेशी घट्ट नाळ जोडलेल्या लोकनेत्या चा आज वाढदिवस,,,,,,,,

जनतेशी घट्ट नाळ जोडलेल्या लोकनेत्या चा आज वाढदिवस,,,,,,,,

मा,अजितराव घोरपडे सरकारांचा आणि कोकणच्या लाल मातीचा संबंध सन 2001 मध्ये आला,,,सरकार सिधुदुर्ग चे पालकमंत्री झाले,त्या दिवसापासून आम्ही कार्यकर्ते सरकारांशी तनाने व मनाने जोडले गेलो,,,,,,,,,,
प्रचंड दूरदृष्टी असलेले नेतृत्व कोकणला पर्यायाने आम्हाला लाभले,सरकारांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ हा सोनेरी दिवसांनी भारलेला होता,सरकारांचे पालकमंत्री या नात्याने त्यावेळी महिन्याला तीन चार दौरे असायचे,जिल्हा अनेक नवनवीन योजनांच्या माध्यमातून विकासाची दौड करत होता,, मा,नारायणराव राणे साहेबांनी ज्या गतीने प्रशासन पळवले होते त्याच गतीने सरकार प्रशासन पळवत होते,,,मी त्यावेळी जिल्हा युवक काँग्रेस चा अध्यक्ष असल्याने नेहमीच मा,सरकारांच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात जिल्हाभर फिरत असायचो,,प्रत्येकवेळी सरकार समाजातल्या शेवटच्या घटकाचा विचार करायचे,,,अशा काम करण्याच्या पद्धती मुळे कोकणातील हजारो कार्यकर्ते सरकारांशी जोडले गेले,, त्यावेळी सरकारांच्या गाडीच्या मागे कार्यकर्त्यांच्या पाच पन्नास गाड्यांचा ताफा असायचा,,,,,आणि आजही सरकार कोणत्याही पदावर नसताना सुद्धा सिंधुदुर्गात आले तरी तसाच गाड्यांचा ताफा आणि कार्यकर्त्यांचा गराडा असतोच !!!!
कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक फळबागांयतीचे अनेक प्रयोग साहेबांनी केले सिंधुदुर्ग च्या कलेक्टर ना शेतकऱ्यांच्या बांधावर चिखलामध्ये उभा करून योजना राबवुन घेणारे मंत्री आम्ही पाहिले,रयतेच्या कल्याणासाठी जें जे करता येईल ते साहेबांनी कोकणी जनतेसाठी केले,,,पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा सर्वेसर्वा असतो हे साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे जनतेला समजले,, ,,,,,,,, साहेब पालकमंत्री असताना कोकणातील हापूस आंब्याला मुंबईत बाजारपेठ मिळावी म्हणून साहेबांनी मुंबईतील हौसिंग सोसायटीच्या फेडरेशन ला एकत्र करून बागायतदार ते ग्राहक अशी थेट मार्केटिंग ची व्यवस्था केली त्याचप्रमाणे मुंबईत *आंबा महोत्सव भरवून शेतकऱ्यांच्या खिशात थेट पैसे जातील हि व्यवस्था केली त्यासाठी बाजार समितीचे कायदे बदलले,महाराष्ट्र शासन पूर्णपणे कोकणातील,आंबा बागायतदारांच्या पाठी उभे करून आपल्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत तीनआंबा महोत्सव यशस्वी केले,,,,,,,, ,आजही कोणत्याही सत्तेच्या पदावर नसताना सुध्दा सरकारांचे शेतकऱ्यांसाठी तेच प्रयत्न सुरू आहेत,,,,,सांगलीतील शेतकऱ्यांच्या द्राक्षांना चांगला भाव मिळावा व गोवा हि आंतरराष्ट्रीय ग्राहक पेठ आहे हे ओळखून गोवा मार्केटिंग फेडरेशन चे अध्यक्ष माजी मंत्री श्री वेळीप यांच्याशी संपर्क साधून व सांगली बाजार समिती व गोवा मार्केटिंग फेडरेशन च्या सहकार्याने 20 मार्च 2021 रोजी फोंडा गोवा येथे *द्राक्ष महोत्सव* भरविण्यात आला,,,मला सुध्दा त्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले, त्या कार्यक्रमातील मा घोरपडे सरकार यांचे भाषण म्हणजे *शेतीवर आधारित अर्थव्यवस्था*,,,असे उत्कृष्ट मार्गदर्शन,,,,मार्गदर्शन म्हणण्या पेक्षा,,,,,ते एक *बौद्धिक* होते !!!!
मा,सरकारांच्या कामकरण्याच्या पद्धती मध्ये कोणताहि हेतु नसतो अथवा कोणताही स्वार्थ नसतो फक्त सर्वसामान्य माणसाला सुखी समृद्ध करावे हाच ध्यास असतो,,,,,,,राजकारणात चढ उतार हे नेहमीच येत असतात, अनेक नेत्यांच्या,,, साक्षात देवादिकांच्या, साधुसंतांच्या जीवनात सुद्धा चढ उतार आलेले आहेत,,,,,साहेबांच्या राजकीय जीवनात पण हे दिवस आलेत पण हे दिवस असेच थांबत नाहीत,, *पुन्हा पहाट होईल ते सोनेरी दिवस उगवतील*,,,,,, आपण कार्यकर्त्यांनी सरकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे,,,, राजकीय स्थित्यंतरे हि होतच रहातील,,आपण सातत्य राखले पाहिजे,,,,,,,,,,,,
खरे म्हणजे मा,घोरपडे सरकारांच्या बद्दल लिहायला गेल्यास कित्येक पाने खर्ची पडतील व वेळ पण पुरणार नाही,,अशा हया लोकनेत्या च्या वाढदिवसाच्या आजच्या शुभदिनी परमेश्वराने त्यांना दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
शुभेछुक : *संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*,,,,,,,
*सावंतवाडी*,,,
*सिंधुदुर्ग*,,,,
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =