You are currently viewing आदरणीय लोकनेते कै. विलासराव देशमुख साहेबांचा आज जन्मदिवस

आदरणीय लोकनेते कै. विलासराव देशमुख साहेबांचा आज जन्मदिवस

 

ज्यांच्या नेतृत्वाखाली मी कार्यकर्ता म्हणून राजकीय व्यासपीठावर आलो. ज्यांनी मला, आदर, मानसन्मान, अपार प्रेम, दिले सदैव मार्गदर्शन केले. त्या वेळच्या काँग्रेस पक्षातील गटाततटाच्या राजकारणात सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मला जिल्यात विलासराव देशमुख साहेबांच्या गटाचे नेतृत्व करण्याची संधी मला साहेबांनी दिली. आम्हाला मार्गदर्शन केले. राजकीय ताकद दिली. एक सुसंस्कृत, अभ्यासु, राजबिंडे व्यक्तिमत्त्व लाभलेला लोकनेता महाराष्ट्राने पहिला.. राजकीय नेते प्रत्येक घरात चर्चेचा विषय असतात असेही नाही. घरातील टिव्ही चॅनेलवर संपूर्ण कुटुंबाला त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर जो चेहरा पाहवासा वाटतो असे कीती चेहरे असतील ? पण हे ठामपणे सांगता येईल.. सर्वांना हवाहवासा वाटणारा व आंनद देणारा चेहरा विलासरावांचा होता. असा हा लोकनेता महाराष्ट्राने अनुभवला. त्या महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या लोकनेत्याच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम 🙏

संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा