You are currently viewing शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी अभिनंदनिय निवड..

शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी अभिनंदनिय निवड..

मसुरे  :

 

मसुरे गावचे सुपुत्र समाज सेवक श्री शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री राहुल गोविंदराव केंद्रे यांनी श्री बाळा गोसावी यांना दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे विचार अगदी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी या पदाचा विनियोग करावा तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या भारत देशाची वाटचाल जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून सुरू आहे यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाचे काम या पुढेही असेच सुरू ठेवावे असे आवाहन राहुल केंद्रे यांनी श्री बाळा गोसावी यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे.

श्री शांताराम उर्फ बाळा गोसावी हे मसुरे गावचे सुपुत्र असून अनेक शासकीय योजनांचा तसेच शासकीय कारभाराचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. कैलासवासी नारायण शांताराम गोसावी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अगदी तळागाळातील लोकांपर्यंत त्यांची नाळ जोडलेली आहे. गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी या सेलच्या मालवण तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी या पदाला योग्य तो न्याय दिलेला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी या सेलच्या माध्यमातून अनेक लोकांच्या गाठीभेटी घेऊन विविध विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या वरिष्ठ पदाधिकारी, आदरणीय भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेतेमंडळी यांच्याकडे पाठपुरावा करून अनेक प्रश्न सोडविले आहेत. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत, प्रांतिक सदस्य भारतीय जनता पार्टी श्री दत्ता सामंत, भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार श्री बाळा गोसावी यांनी मानले आहेत. याबाबतचे लेखी पत्र श्री राहुलजी केंद्रे यांनी बाळा गोसावी यांना सोमवारी दिले.

यावेळी बोलताना श्री बाळा गोसावी म्हणालेत मिळालेल्या पदाचा उपयोग जनसामान्यांसाठी करून भारतीय जनता पक्षाची तत्वे आणि हा पक्ष तळागाळात रुजवण्यासाठी तन-मन-धन अर्पण करून आपण काम करणार आहोत.येत्या काही काळातच भाजप भटके विमुक्त आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी आपण सर्व ते योगदान देणार आहे. मला मिळालेले हे पद भारतीय जनता पक्षाच्या तसेच भाजप भटके विमुक्त आघाडीच्या सर्व कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी यांचे असून सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण योग्य ते काम करणार आहोत.

त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाचे कल्याण डोंबिवली चे युवा भाजपा नेते नंदू दादा परब, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महेश बागवे, विलास मेस्त्री, जितेंद्र परब, संतोष पालव, बाबू आंगणे, दीपक पाटकर, नाना सामंत, महेश परब, बाळा सामंत, प्रथमेश निकम, सुधाकर बिरमोळे, नरेश आंगणे, सतीश आंगणे, अशोक बागवे आणि नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य, मसुरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 16 =