सावंतवाडी पालिका सभागृहाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा – पुंडलिक दळवी

सावंतवाडी पालिका सभागृहाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा – पुंडलिक दळवी

राष्ट्रवादीकडुन मुख्याधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी…

सावंतवाडी

येथील पालिका सभागृहाचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून राजकीय वापर होत आहे. त्यामुळे हा प्रकार रोखावा, तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते तथा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी पालिकेच्या सभागृह पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला होता. यावरून श्री. दळवी टीका केली आहे. सावंतवाडी येथे सत्तांतर झाल्यानंतर लोकमान्य टिळक सभागृहाचा वापर हा पक्ष कार्यक्रमासाठी केला जात आहे. गेले काही दिवस हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तो तात्काळ थांबविण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा