चिंदर येथे खरीप हंगामासाठी खत विक्री शुभारंभ.
मालवण
श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, चिंदर यांचा खरीप हंगामासाठी खत विक्री शुभारंभ आज सोसायटी चेअरमन सीताराम ( देवेंद्र ) हडकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील शेतक-यांना सेंद्रिय खते, सुफला, कृषी उद्योग यासह विविध प्रकारची खते विक्री करण्यात आली.
यावेळी सोसायटीच्या बैठकीत आगामी काळात शेती कर्ज, दीर्घ
मुदत, अल्प मुदत व अन्य कर्ज वसुली करण्याबाबत चर्चा झाली. २५ जुन पुर्वी सर्व कर्जदारांकडून कर्ज वसुली व त्या कर्जदारांना नव्याने कर्ज उचल देण्याचे नियोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग बँकेच्या धोरणानुसार नव्याने कर्ज उचल शेतक-यांना देत असताना सातबारा व आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे ठरवण्यात आले. तसेच संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने विविध मुद्दांवर चर्चा झाली.
मिश्र खत, सुफला, मायसिग्रीन, युरिया खते उपलब्ध असून सुफला आणि युरिया खतावर आधारकार्ड आवश्यक असून 9421638236 व 8010408816 या क्रमांकांवर संस्थेचे सचिव कविंद्र माळगावकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी व्हाईस चेअरमन सुनिल पवार, संचालक दिगंबर जाधव, तज्ञ संचालक विवेक परब, आप्पा गावडे, संस्था सचिव कविंद्र माळगावकर, वासुदेव मुळे, विनोद खोत आदी उपस्थित होते.