You are currently viewing कणकवली, मालवण येथील ‘ती’ विकासकामे मार्गी लावणार…!

कणकवली, मालवण येथील ‘ती’ विकासकामे मार्गी लावणार…!

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांना आश्वासन

सिंधुदुर्ग

कणकवलीतील प.पु. भालचंद्र महाराज संस्थानला अधिकच्या जागेसाठी तसेच मालवण नगरपरिषदेला मत्स्यालय साठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देणार. अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली.

प.पु. भालचंद्र महाराज हे समस्त महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने कणकवलीतील आश्रमात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. या गर्दीचा विचार करता भाविकांना अधिक सोयीस्करपणे भालचंद्र बाबांचे दर्शन होण्यासाठी आश्रमाला अधिक जागेची मागणी संस्थानकडुन आणि समस्त भाविकांकडून नेहमीच होत आली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा नं. ३ आणि नगरपंचायतीची जागा संस्थानला देऊन शाळेला पर्यायी जागा जुन्याच जागेच्या जवळच २० ते ५० मिटर दरम्यान उपलब्ध करुन शाळेची इमारत बांधुन द्यावी आणि यासाठी भरगोस निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची MSRDC ऑफिस मुंबई येथे संबंधित अधिकारी व भालचंद्र महाराज संस्थानचे प्रतिनिधी यांच्यासह भेट घेतली.

प.पु.भालचंद्र महाराज हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या पुण्याच्या कामासाठी कणकवली नगरपंचायत व जिल्हा परिषद यांचे देखील सहकार्य घेऊन हि संस्थानची मागणी पुर्ण करणार असल्याचे नाईक व पारकर यांनी सांगितले.

या महत्वाच्या बैठकीत मालवण नगरपरिषद क्षेत्रामधे मत्स्यालय तसेच म्युनिसिपल प्लाझा कमफिश अक्वेरियम उभारणीसाठी आणि पालिकेतील अन्य नियोजित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी देखील आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांनी केली.

या दोन्ही मागण्यांची त्वरीत दखल घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कणकवली भालचंद्र महाराज संस्थान साठी २० गुंठे जागा उपलब्ध करुन शाळेची सुसज्ज ईमारतही बांधुन देण्याचे तसेच मालवण नगरपरिषद क्षेत्रातील मत्स्यालय आणि इतर सर्व विकासकामे मार्गी लावणार, असे आश्वासन आमदार नाईक व पारकर यांना दिले. तसेच कणकवली व मालवण शहरातील दोन्ही महत्वाच्या कामांच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना तसे प्रस्ताव त्वरीत सादर करण्यास सांगितले.

यावेळी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासोबत नगरविकास प्रधान सचिव भुषण गगराणी, सचिव महेश फाटक, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे खाजगी स्विय सहाय्यक खतगावकर, कणकवली मुख्याधिकारी  वैभव साबळे, भालचंद्र आश्रम संस्थानचे प्रतिनिधी प्रविण पारकर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, मालवण मुख्याधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =