You are currently viewing पंधरवडा सेवा सप्ताह निमित्त आयोजित आरोग्य शिबिराचे डॉ दुर्भाटकर यांच्याहस्ते उद्घाटन; राजू बेग यांच्याहस्ते सत्कार

पंधरवडा सेवा सप्ताह निमित्त आयोजित आरोग्य शिबिराचे डॉ दुर्भाटकर यांच्याहस्ते उद्घाटन; राजू बेग यांच्याहस्ते सत्कार

सावंतवाडी

शहर भाजप आणि स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवडा सेवा सप्ताह आयोजित केला असून यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. २० व २१ सप्टेंबर रोजी काझी शहाबुद्दीन हॉल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आज डॉ.ज्ञानेश्वर दुरभाटकर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी राजू बेग यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

तसेच आज २१ सप्टेंबरला मोफत महा आरोग्य शिबीरातून विविध आजारांवर उपचार केले जाणार आहेत. नेत्र तपासणी शिबिरात अल्प दरात चांगल्या दर्जाचे चष्मा वाटप करण्यात येणार आहे.

यासाठी सावंतवाडीच शुभांगी अॉप्टीक्स विशेष सहाकार्य करणार आहे. २२ सप्टेंबर रोजी शहरातील युवकांसाठी प्रतिथयश उद्योजक व व्यावसायिकांद्वारे युवा वर्गाला मार्गदर्शनपर चर्चासत्राच आयोजन करण्यात आले आहे.

युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, अँड. विक्रम भांगले, बीकेसीचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले, युवा उद्योजक शैलेश पै, अँड. रूजूल पाटणकर आदींच्या उपस्थितीत हा संवाद कार्यक्रम होणार आहे.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष निशांत तोरसकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, संदेश टेमकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा