You are currently viewing ज्ञान जन्माची शिदोरी

ज्ञान जन्माची शिदोरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्रा. सत्यवान घाडी लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*ज्ञान जन्माची शिदोरी*

*******************

 

माझ्या विद्यार्थी बाळांनो

तुम्ही घ्यावे एक ध्यानी

ज्ञान जन्माची शिदोरी

देई साथ माते वाणी।।१।।

 

ज्ञान प्राप्ती करण्यास

नित्य लागे उपासना

दृढ निश्चय करून

करा त्याची आराधना।।२।।

 

मनी ठेवावा सदैव

माय- बापाचा आदर

गुरू पहिले अपुले

ज्ञान देती निरंतर।।३।।

 

गुरू विना नाही जगी

पूर्ण ज्ञान मिळे कधी

विना आदरे तयांच्या

प्राप्त होईना ते कधी।।४।।

 

ज्ञान आहे एक गंगा

यावी अपुल्या मळ्यात

सद्गुणांचा भव्य हार

नित्य घालावा गळ्यात।।५।।

 

ज्ञान प्राप्त करुनिया

घ्यावी उंच ती भरारी

मनी प्रभूला भजता

संकटात तोची तारी।।६।।

 

*****************************

*रचनाकार:-* प्रा. सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा

 

*मो.नं.:-* ९६६४८१४८९४

 

🪴🪷🌴🌹🦚🌷🌴🪷🪴

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 8 =