You are currently viewing मालवणात धुलीवंदनाच्या उत्साहावर विरजण; आडारी नदीत  बुडाला युवक

मालवणात धुलीवंदनाच्या उत्साहावर विरजण; आडारी नदीत  बुडाला युवक

मालवणात धुलीवंदनाच्या उत्साहावर विरजण; आडारी नदीत  बुडाला युवक

मालवण :

धुलीवंदनाचा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना मालवणमध्ये धुलीवंदनाच्या उत्साहावर विरजण पडले. रंगपंचमी करून आंघोळीसाठी आडारी नदीपात्रात उतरलेला देवेंद्र उर्फ दीपक जयराज वेंगुर्लेकर (वय २५) हा युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रंगपंचमी साजरी केल्यानंतर येथील जवळपास १० ते १२ युवाक आडारी नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील देवेंद्र वेंगुर्लेकर हा युवक पाण्यात बुडाला. सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा