तोंडवली बावशीत भाजपात प्रवेशकर्त्यांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत…

तोंडवली बावशीत भाजपात प्रवेशकर्त्यांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत…

युवा सेना उपतालुका प्रमुख आबु मेस्त्री व माजी उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी यांचे स्पष्टीकरण

नेतृत्वाला खुश करण्यासाठी स्वत:च्या पक्षातीलच कार्यकर्त्यांचा प्रवेश

कणकवली

कणकवली तालूक्यातील तोंडवली बावशी ग्रा.पं.ची मुदत संपलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून निवडणूका जाहीर व्हायचे असल्या तरी राजकीय स्वार्थ साधला जात आहे. आम.नितेश राणेंच्या उपस्थितीत ज्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे .त्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत. भाजपा नेतृत्वाला खुश करण्यासाठी भाजपच्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश करत हा उपद्व्याप केल्याचा आरोप युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख व आबु मेस्त्री व माजी उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी यांनी केला आहे. .
कालच आम.नितेश राणेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला. ते सेनेचे दाखवत तोंडवली बावशीत भगदाड अशी केली. या कार्यकर्त्यांचा सेनेशी काहीही संबध नसून स्वत:च्या पक्षातीलच कार्यकर्त्यांचा प्रवेश घेवून येथील पदाधिकारी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही या पत्रकात केला आहे .
तोंडवली बावशीत प्रवेश दाखवून सेनेला काही फरक पडणार नसून या ग्रा.पं.वर पुन्हा सेनेचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री व माजी उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी यांनी केला आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा