You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायत वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

फोंडाघाट ग्रामपंचायत वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

फोंडाघाट :

 

फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या वतीने गावात आरोग्य विषयक शिबिरे, तपासणी व मार्गदर्शन तसेच उपचार इत्यादी सह आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया सारख्या सुविधा पुरवल्या जातात. शारीरिक आरोग्यामध्ये डोळ्यांची निगा आणि त्यावरील उपचार यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचा पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा, असे प्रतिपादन फोंडा सरपंच सौ. संजना आग्रे यांनी केले. यावेळी त्यांचे सोबत ग्रामसेवक विलास कोलते, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ इत्यादी उपस्थित होते. डॉक्टरनी उपस्थित शिबिरार्थिना डोळ्यांची काळजी आणि त्याची उपयुक्तता याबद्दल सजग केले.

यामध्येअचूक चष्मा नंबर, मोतीबिंदू निदान, अत्यल्प दरात शस्त्रक्रिया व चष्मे वाटप इत्यादीचा समावेश होता. या शिबिरात गावातील ९० रुग्णांनी लाभ घेतला व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी १५ रुग्णांची तुकडी रुग्णालयाकडे रवाना केली. नेत्रसेवा प्रतिष्ठान- सिंधुदुर्ग, व डॉ. गद्रे रुग्णालय- कणकवली आणि फोंडाघाट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आभार प्रदर्शन ग्रामसेवक विलास कोलते यांनी केले. यावेळी नेत्र रुग्णांनी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा