You are currently viewing सावंतवाडी आगारामध्ये भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष संघटनेची स्थापना

सावंतवाडी आगारामध्ये भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष संघटनेची स्थापना

*भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालयात मा. आम. राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध संघटनेतील एस्. टी. कर्मचाऱ्यांचा भाजपा मध्ये प्रवेश*

 

सावंतवाडी :

शनिवार दिनांक .29 डिसेंबर 2023 रोजी सावंतवाडी आगारामध्ये भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा. आमदार श्री. राजन तेली तसेच जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, सेवा शक्ती संघर्ष युनियनचे विभागीय अध्यक्ष श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत, केंद्रीय कोषाध्यक्ष श्री. राम मुंडे, श्री. मनोज नाईक, आनंद नेवगी, मिसबा शेख, केतन आजगांवकर, विष्णु उर्फ पपु परब तसेच भाजपचे पदाधिकारी व प्रवेश करणारे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत मनोज नाईक यांचेहस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्यांतर मा. आमदार राजन तेली यांनी ७० ते ७२ कर्मचार्यांना सावंतवाडी भाजपा विधानसभा कार्यालयात भाजपप्रणित सेवा शक्ति संघटनेत प्रवेश देऊन स्वागत केले व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्व मान्यवरांच्या व सभासदांच्या उपस्थितीत सावंतवाडी आगारात नामफलकाचे अनावरण संघटनेचे विभागिय अध्यक्ष श्री गोट्या सावंत यांनी फित कापुन व आम. श्री. राजन तेली यांनी श्रीफळ वाढवुन केले. त्यानंतर आगारातील श्री. दत्तमंदिरामध्ये जाऊन एसटीच्या व कामगारांच्या भरभरटीसाठी साकडे घालण्यात आले व तिथुन पुढे कामगार नेते माननीय श्री.अशोक राणे यांच्या समवेत आगार व्यवस्थापक सावंतवाडी यांची सदिच्छा भेट घेण्यात आली व कामगारांचे प्रश्न अलोकेशनमधील मनमानी, रजा देताना भेदभाव, लिपिकांचे प्रलंबित प्रश्न, स्वच्छ बदली, TI, ATI, यांची अरेरावी व नियमबाह्य कामकाज पध्दतीवरुन आगारव्यवस्थापकांना मा. राणेसाहेबांनी संबंधितांना बोलवुन धारेवर धरले व आगारव्यवस्थापकांना येत्या पंधरा दिवसात यामध्ये योग्य सुधारणा न झाल्यास संपुर्ण संघटनेची विभागिय कार्यरकारणी व मी स्वत: येऊन घेराव घालणार व तोडगा निघेपर्यंत हलणार नाही अशा ईशारा दिला तसेच या बैठकीमध्ये दोन वर्षांमध्ये जो कामगारांवरती अन्याय होत होता. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अशोक राणे यांनी केले व केंद्रीय कोषाध्यक्ष श्री. राम मुंडे यांनी कडक भाषेत आगारव्यवस्थापकांना समज दिली. सुमारे दोन तास आगार व्यवस्थाक यांज बरोबर कामगारांवरती अन्याचे विरोधात चर्चा झाली. ती चर्चा करत असताना कामगारांवरती अन्याय होतो ही सत्य बाब आहे हे उपस्थित कामगारवर्गाने मांडलेल्या बाबींवरून सन्माननीय राणेसाहेबांनी आगार व्यवस्थापकांना दाखवून दिले त्यावरती आगार व्यवस्थापक साहेबांनी हे सर्व गोष्टी वरती जातीनिशी लक्ष देऊन कामगारांना त्रास होणार नाही याची ग्वाही दिली व समारोप करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =