You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल(CBSE) कुडाळ च्या साहील शशांक आटक ची आय आय टी साठी निवड

बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल(CBSE) कुडाळ च्या साहील शशांक आटक ची आय आय टी साठी निवड

कुडाळ :

 

येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ चा विद्यार्थी कुमार साहील शशांक आटक हा JEE परीक्षा उत्तीर्ण होऊन IIT भिलाई येथे इंजिनिअरिंग च्या उच्च शिक्षणासाठी पात्र झाला आहे. साहिल हा बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ च्या दहावी च्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दहावी सी बी एस ई बोर्डाच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने आयडियल कॉलेज कणकवली येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. दरम्यान इंजिनिअरिंग अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तेवढाच खडतर असा जे ई ई (JEE) परीक्षेचा अभ्यास त्याने केला. जे ई ई मूख्य परीक्षेनंतर ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेली जे ई ई अॅडव्हान्स परीक्षा त्याने दिली. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन साधारण महिनाभर चालणाऱ्या निवड प्रक्रियेतून त्याने दिलेल्या प्राधान्यक्रमानूसार आणि त्याच्या परीक्षेतील गुणक्रमावरुन त्याची आय आय टी भिलाई साठी निवड करण्यात आली. इंजिनीअरिंग अर्थात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अत्युच्च मानाची अशी भारतीय तंत्रज्ञान संस्था येथे साहीलची निवड होणं ही फारच कौतुकास्पद बाब आहे. नोव्हेंबर २०२१ पासून त्याचा आय आय टी चा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. पिंगुळी गावचा रहिवासी असलेल्या साहिलचे हे यश बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल साठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सेंट्रल स्कूल मध्ये घेतला जाणारा सी बी एस ई अभ्यासक्रम आणि साहिलची प्रमाणिक मेहनत यातूनच हे यश प्राप्त झाले आहे. बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल च्या ईतर विद्यार्थ्यांसाठी साहिलचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांकडून साहिलच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे तसेच त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 9 =